श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात भारतीय लष्करात आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. केलारा भागातील येरवान येथे सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू असताना जोरदार गोळीबार झाला. सध्या लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे.

मागच्या आठवड्यात सुरक्षा दलाने इमामसाहीब भागात एका दहशतवाद्याला ठार केलं होतं. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. तसेच बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं. यामध्ये एका अधिकाऱ्यासह ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त होते.

Jammu Kashmir shopian 3 terrorists killed in encounter between terrorists security forces in the keller area