2 May 2024 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

दक्षिण कोरिया जगातील पहिली 5G सेवा देणारा देश

5G, South Korea

सियोल : तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाला देखील मागे टाकत दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5G सेवा देण्याचा पराक्रम केला आहे. काल म्हणजे बुधवारी रात्री अकरा वाजता देशवासियांसाठी 5G सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली. दक्षिण कोरियाने यापूर्वी ५ एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. परंतु, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी २ दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे 4Gच्या तुलनेत 5G तब्बल २० पटींनी वेगवान असणार आहे.

दक्षिण कोरियाच्या टॉपच्या टेलिकॉम कंपन्या एसके, केटी आणि एलजी यूप्लस यांनी 5G सेवा देशभरात देण्यास सुरुवात केली. कोरियाच्या ६ महत्वाच्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फोनवर ही सेवा सुरु केली. यामध्ये पॉप बँडस् ईएक्सओचे २ सदस्यांसह ऑलिंपिक आईस स्केटींगपटू किम यू ना सहभागी होते. सर्वसामान्यांना शुक्रवारपासून ही सेवा वापरता येणार आहे.

सॅमसंगच्या नव्या गॅलेक्सी एस१० 5G मॉडेलवर पहिल्यांदाच 5G ची सेवा सुरु करण्यात आली. सॅमसंगही देखील कोरियाचीच कंपनी आहे. सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत २,००० डॉलर आहे. नव्या 5G सेवेमुळे देशात ड्रायव्हरलेस कारसारख्या क्षेत्रांना गती मिळण्याची अपेक्षा कोरियाला आहे. यामुळे आर्थिक विकासालाही गती मिळेल. दक्षिण कोरिया अर्थव्यवस्थेची गती सारखी धीमी होत आहे. २०१८ मध्ये आर्थिक स्तर सहा वर्षांपेक्षा खाली आला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x