
Sakari Gold Scheme | स्वस्तात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या सोमवारपासून स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी सरकार देणार आहे. 6 मार्च 2023 पासून गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी) योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतील. पाच दिवसांसाठी उघडणाऱ्या गोल्ड बाँडची किंमत ५,६११ रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. 2022-23 च्या चौथ्या सीरिजअंतर्गत सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 6 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत खरेदीसाठी उपलब्ध असेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
6 ते 10 मार्चदरम्यान स्वस्त दरात मिळणार सोनं
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत ६ ते १० मार्च या कालावधीत स्वस्त सोने मिळणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2022-23 च्या चौथ्या सीरिजची इश्यू प्राइस 5,611 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार, ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने गोल्ड बाँडसाठी अर्ज करणाऱ्या आणि पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस प्रति ग्रॅम 50 रुपयांनी कमी करण्यात येणार आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची इश्यू प्राइस 5,561 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आरबीआयने जारी केले गोल्ड बाँड
वास्तविक देशाची मध्यवर्ती बँक आरबीआय भारत सरकारच्या वतीने गोल्ड बाँड जारी करते. हे केवळ निवासी व्यक्ती, अविभक्त हिंदू कुटुंबे (एचयूएफ), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात. वर्गणीची कमाल मर्यादा व्यक्तींसाठी वार्षिक 4 किलो, एचयूएफसाठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी वार्षिक 20 किलो आहे.
सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी करण्याच्या हेतूने नोव्हेंबर २०१५ मध्ये पहिल्यांदा गोल्ड बाँड योजना सुरू करण्यात आली होती. तर सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 56103 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर चांदीचा भाव 64139 रुपये किलोवर पोहोचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.