29 April 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही: प्रणव मुखर्जी

Pranab Mukherjee, Narendra Modi

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील एका पुरस्कार सोहळ्यातच मुखर्जी यांनी नाव न घेता मोदींना लक्ष्य केलं. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी उपस्थितांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी विधान केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश गेल्या कित्येक वर्षांपासून दारिद्र्याची लढाई लढतो आहे. त्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे, देशातील १ टक्के लोकांकडे देशातील 60 टक्के पैसा असून ही चिंताजनक बाब आहे. आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील ७व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था ही युएसडी २.६९ ट्रिलियन्स एवढी आहे. सध्या मार्च २०१९ चा भारताचा विकासदर ७.४ असून पुढील वर्षी म्हणजे २०१९-२० मध्ये हा विकासदर (जीडीपी) ७.६ टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही मुखर्जी यांनी

देशातील कार्पोरेट वर्गाने पुढे येऊन देशातील बेरोजगारी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वैयक्तिक नव्हे, तर रोजगार निर्मित्ती, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या अर्थिक विकासाची धोरणं राबविली पाहिजेत. त्यासोबतच आरोग्य क्षेत्राकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचे मुखर्जी यांनी या परिषदेत बोलताना म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x