3 May 2025 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मोदी-शहांच टेन्शन वाढलं, येडियुरप्पा यांच्या मुलामुळे कर्नाटक भाजप नेत्यांमध्ये उघडपणे बंडखोरी, भाजप सोडण्याची धमकी

Karnataka Assembly Election 2023

Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याच्या कवायतीत गुंतलेल्या भाजपसमोर अचानक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचं निवडणुकीतील वाढतं राजकीय वजन आणि महत्व, ज्यांच्या भरोशे वरिष्ठ भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी झटत आहेत, त्यांच्यामुळे आता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसपूस वाढल्याचं वृत्त आहे. या स्थानिक नेत्यांना आता बीएस येडियुरप्पा यांच्या मुलापासून राजकीय धोका असल्याची चर्चा सुरु झाल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

निवडणुकीपूर्वी वडिलांच्या वाढत्या उंचीचा फायदा घेऊन मुलगा राजकीय खेळ करणार नाही ना अशी भीती या नेत्यांना वाटू लागल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे ही चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळविण्यात आली आहे. सध्या अरुण सिंह आणि धर्मेंद्र प्रधान हे दोन केंद्रीय नेते या प्रकरणी स्थानिक संपर्कात आहेत.

निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा यांची वाढती मागणी
2021 मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येडियुरप्पा यांना भाजपने अत्यंत लो प्रोफाइल ठेवल आहे. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने येडियुरप्पा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. येथील लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व येडियुरप्पा यांच्याकडे लक्ष देत आहे. पंतप्रधान मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत त्यांना महत्व देतं आहेत. तसं पाहिलं तर बऱ्याच अंशी निवडणुकीची धुरा येडियुरप्पा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कारण मोदी-शहा यांचा कर्नाटकात काहीच प्रभाव नाही आणि कानडी भाषा अवगत नसल्याने सभांमध्ये मारलेले ‘निवडणुकांपुरतीचे राजकीय डायलॉग’ स्थानिक लोकांना कळणार नाहीत.

कर्नाटक भाजपमध्ये धाकधूक
केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे कर्नाटक भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. लिंगायत-पंमासाली सब सेक्शन, वोकालिगा आणि ओबीसीशी संबंधित विविध नेते यामुळे प्रचंड नाराज आहेत. खरं तर त्यांच्या अडचणीचं कारण बीएस येडियुरप्पा नसून त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र आहेत. वडील मुख्यमंत्री असताना विजयेंद्र यांनी बराच प्रभाव पाडला होता. आता या निवडणुकीतही त्यांच्या वडिलांना महत्त्व दिले जात आहे. त्याचबरोबर विजयेंद्र यांना शिवमोग्गा येथील शिकारीपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही वृत्त आहे.

अनेक नेत्यांमध्ये असंतोष, भाजप सोडण्याचे संकेतही दिले
यामुळे अनेक नेत्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. एकीकडे लिंगायत समाजाचे नेते पाटील यतनाल आणि अरविंद बेलाद यामुळे प्रचंड नाराज आहेत. त्याच वेळी, वोकालिगा नेते सीटी रवी, सीपी योगेश्वर, सीएम अश्वथ नारायणही अधिक असंतुष्ट झाले आहेत. चिंतेचं कारण म्हणजे ज्येष्ठ लिंगायत मंत्री व्ही सोमन्ना यांनी उघडपणे बंडखोरी केली असून भाजप सोडण्याचे संकेतही दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय नेतृत्वही सावध झाले आहे. अरुण सिंह आणि धर्मेंद्र प्रधान यांना डॅमेज कंट्रोलसाठी पाठवण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Assembly Election 2023 BJP political crisis check details on 06 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka Assembly Election 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या