नवी दिल्ली : कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा २ मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल असून आज ते अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा अर्ज भरण्याआधी ते अमेठीत रोड शो करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी दहा वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, राहून गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला होता, त्यावेळी अमेठीच्या भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. राहुल गांधींनी अमेठीतून उमेदवारी अर्ज न भरता वायनाडमधून प्रथम उमेदवारी अर्ज भरला हा अमेठीतील लोकांचा अपमान असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

राहुल गांधी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार