29 April 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

'काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकात दंगली होतील', कर्नाटकातील निवडणुकीत पराभवाच्या भीतीने अमित शहांची सभेत धक्कादायक धार्मिक धमक्या

Karnataka Assembly Election 2023

Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटकमध्ये काँग्रेससत्तेत आल्यास दक्षिणेकडील राज्यात घराणेशाही शिगेला पोहोचेल आणि १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हिन्दू-मुस्लिम दंगलीच्या धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील तेरडाळ येथील जाहीर सभेत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि आगामी निवडणुका काँग्रेसने जिंकल्यास कर्नाटकच्या विकासाला ‘रिव्हर्स गियर’चा फटका बसेल, अशी धमकीच त्यांनी सभांमधून दिली. राज्यात राजकीय स्थैर्यासाठी जनतेचा कौल मिळावा, अशी मागणी करताना अमित शहा म्हणाले की, केवळ भारतीय जनता पक्षच नव्या कर्नाटकाकडे नेऊ शकतो.

‘चुकून काँग्रेस सत्तेत आली तर भ्रष्टाचार शिगेला पोहोचेल आणि ‘तुष्टीकरण’ होईल,’ असे वक्तव्य अमित शहा यांनी केलं. दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर जाऊन भाजप नेत्यांसोबत जाहीर सभा, रोड शो आणि आढावा बैठका अमित शहा यांनी घेतल्या. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही केवळ आमदारनिवडीपुरती नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कर्नाटकचे भवितव्य सोपविण्याची आहे असं सांगताना येथे भाजपच सत्तेत असल्याचा अमित शहा यांना विसर पडल्याचं पाहायला मिळालं. ही विधानसभा निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही तर कर्नाटकचे भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपविण्यासाठी आहे. कर्नाटकला विकसित राज्य बनवण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य आणण्यासाठी ही निवडणूक आहे.

कर्नाटकात दंगली होतील
काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकात हिंदू-मुस्लिम दंगली होतील, असे धक्कादायक विधान आणि धमकीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर सभेत दिली. अमित शहांनी केलेले वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणे केलेले वक्तव्य असून निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटकातील बेळगाव मध्ये मंगळवारी एका जाहीर सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेसचं सरकार आल्यास राज्याचा विकास उलटा होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Assembly Election 2023 Amit Shah Rally check details on 26 April 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka Assembly Election 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x