29 April 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

'द हिंदू' विजय? राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का

Rafael Deal, Rafael Fighter Deal, Narendra Modi, BJP

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच जोरदार धक्का दिल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सुप्रीम कोर्टाने स्पष्ट फेटाळला आहे. फ्रान्ससमवेत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असे नमूद केले आहे त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार नाही अशी प्राथमिक हरकत केंद्र सरकारने घेतली होती. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे.

कोर्टात याचिकाकर्त्यांनी सादर केलेली कागदपत्रं मान्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राफेलशी संबंधित जी कागदपत्रं लीक झाली होती, त्याच्या आधारे फेरविचार याचिकेवर सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेत ‘लीक’ कागदपत्रांचा वापर करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लीक झालेली कागदपत्रं वैध असल्याचं सांगितलं आहे.

तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने जी नवी कागदपत्रं समोर आली आहेत त्यांच्या आधारे याचिकांची सुनावणी केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय तारखा निश्चित करणार आहे. ही कागदपंत्र गोपनीय असल्याचं सांगत केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला होता. द हिंदू वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या कागदत्रांना केंद्राने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असंवेदनशील असल्याचं सांगत या कागदपत्रांची बेकायदेशीरपणे फोटोकॉपी करण्यात आल्याचा दावा केला होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x