17 May 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Mutual Fund SIP | 5 स्टार रेटिंग असलेली म्युचुअल फंड योजना, मल्टिबॅगर परतावा मिळेल, डिटेल वाचून पैसे लावा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | शेअर बाजार सध्या अस्थिर असताना कशात गुंतवणूक करावी असा प्रश्न गुंतवणुकदारांना भेडसावत आहे. अशा काळात गुंतवणुकदार म्युचुअल फंडकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून पाहू शकतात. ‘फ्लेक्सी कॅप फंड’ हा गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय मानला जातो. ‘फ्लेक्सी कॅप फंड’ सर्व प्रकारच्या मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावतात. मागील काही वर्षांत ‘फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड’ ची लोकप्रियता वाढली आहे. आज या लेखात आपण CRISIL द्वारे 5-स्टार रेटिंग दिलेले क्रमांक 1 चे 2 फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड पाहणार आहोत. (JM Flexicap Fund Growth)

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेला CRISIL ने क्रमांक 1 रेटिंग दिली आहे. या म्युचुअल फंडाची निव्वळ मालमत्ता म्हणजेच एनएव्ही 1127.291 आहे. या योजनेची एयूएम म्हणजेच अॅसेट अंडर मॅनेजमेंट सुमारे 31,625 कोटी रुपये आहे. या म्युचुअल फंडाने ICICI बँक, HDFC बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, HCL टेक्नॉलॉजीज, या सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या म्युचुअल फंडाने प्रामुख्याने दिग्गज लार्ज कॅप कंपन्यांमध्ये आपले 70 टक्के भांडवल गुंतवले आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 26.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने सरासरी वार्षिक 13.42 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंड योजना ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. यात तुम्हाला शाश्वत परतावा मिळेल याची गॅरंटी नाही. जर तुम्ही जोखीम घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही FD सारख्या सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक करू शकता.

जेएम फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड :
CRISIL ने या म्युचुअल फंड योजनेला ‘Good’ रेटिंग श्रेणीमध्ये ठेवले आहे. जेएम फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंडाने लार्ज कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 46.04 टक्के भांडवल लावले आहे. तर मिड कॅप शेअर्समध्ये 16.08 टक्के आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये 11.17 टक्के भांडवल लावले आहे. फ्लेक्सी-कॅप प्रकारात CRISIL ने या म्युचुअल फंड योजनेला क्रमांक 1 ची रेटिंग दिली आहे.

जेएम फ्लेक्सी कॅप फंडाचा परतावा :
मागील 10 वर्षात या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 15.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षात लोकांना सरासरी वार्षिक 13.14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. JM Flexi Cap Fund चे NAV मूल्य 54.70 रुपये आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपले भांडवल लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, यासारख्या दिग्गज कंपन्यामध्ये लावले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Fund SIP scheme for investment and benefits check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x