
Paytm Share Price | ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स जेव्हापासून शेअर बाजारात सूचीबद्ध झाले, तेव्हापासून त्यात घसरण पाहायला मिळत आहे. मात्र आता कंपनीचे शेअर्स वाढतील अस अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनाक 16 मार्च 2023 या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 569.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. परकीय ब्रोकरेज हाऊस Citi ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पेटीएम कंपनीचे फेब्रुवारी 2023 या कालावधीचे ऑपरेशन मेट्रिक्स स्टॉक मध्ये वाढीचे संकेत देत आहेत. सिटी फर्मचे तज्ञ म्हणतात की, पुढील काळात पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये 82 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 582.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (One 97 Communications Ltd)
ब्रोकरेज फर्म Citi ने पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 1,061 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. परकीय ब्रोकरेज फर्मने पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर 1,061 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 2023 या वर्षात आतापर्यंत पेटीएम कंपनीचे शेअर्स 10 टक्के मजबूत झाले आहेत. त्याच वेळी पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 9.45 टक्के कमजोर झाले आहेत. पेटीएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 844.70 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 438.35 रुपये होती.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
‘पेटीएम’ कंपनीने आता नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षी पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मागील काही महिन्यांत पेटीएम शेअर्सबाबत तज्ञ सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. कारण कंपनीने आपले सर्व लक्ष आणि ताकद नफ्यावर केंद्रित केले आहे. पेटीएम कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीच्या निकालात पॉझिटिव्ह EBITDA नोंदवला आहे. तसेच कंपनीने आपल्या तोट्यात ही मोठी काळात केली आहे. पेटीएम कंपनीने जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 मध्ये आपला वाढीचा वेग कायम ठेवला आहे. पेटीएम कंपनीने आपल्या पेमेंट आणि कर्ज वितरण व्यवसायात सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत पेटीएम कंपनीच्या प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वितरणात वार्षिक 286 टक्के वाढ होऊन 8086 कोटी रुपयेवर पोहचली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.