7 May 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Nykaa Share Price | नायका शेअर एवढा का घसरतोय? 5 दिवसात 9% खाली आला, टार्गेट प्राईस पहा, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन, वेलनेस, आणि फॅशन उत्पादने विकणाऱ्या नायका कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नायका कंपनीची मूळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनप्रमाणे आज देखील नायका कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 11 टक्के घसरणीसह 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नोव्हेंबर 2022 नंतर नायका कंपनीच्या शेअरमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण होती. नायका कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के घसरणीसह 132.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टार्गेट प्राईस :

अनेक ब्रोकरेज हाऊसने नायका कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे भाकीत व्यक्त केले आहे. तज्ञांनी नायका कंपनीच्या शेअरची लक्ष्य किंमत कमी केली आहे. पूर्वीच्या लक्ष किमतीमध्ये बदल करून तज्ञांनी नवीन लक्ष्य किंमत 163 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनच्या तज्ञांनी देखील नायका कंपनीच्या शेअर्सवर 105 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

शुक्रवारच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत नायका कंपनीचे शेअर्स 27 टक्के कमजोर होतील असा अंदाज ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने व्यक्त केला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नायका कंपनीच्या स्टॉकवर 165 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

जून तिमाही कामगिरी :

जून 2023 तिमाहीत नायका कंपनीचा एकूण निव्वळ नफा 8 टक्क्यांच्या वाढीसह 5.4 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत नायका कंपनीने 5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 च्या तिमाहीत नायका कंपनीने 1,422 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या जून तिकाहीत कंपनीने 1,148 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील एका महिन्यात नायका कंपनीच्या शेअरची किंमत 9.31 टक्के घसरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price today on 16 August 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x