 
						Deep Industries Share Price| ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने सेबीला कळवले की, कंपनी आपले शेअर्स 1 : 5 या प्रमाणात विभाजित करणार आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 10 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 267.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Deep Industries Limited)
कंपनीचे स्पष्टीकरण :
‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने सांगितले की, “दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या विभाजनासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. रेकॉर्ड तारीख म्हणून 10 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या स्टॉक स्प्लिट योजने अंतर्गत कंपनी आपले विद्यमान शेअर पाच तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे.
दीप इंडस्ट्रीजच्या शेअर्स किमतीचा इतिहास : ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना मालामाल बनवले आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणूकदारांना 9.87 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 17.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 4.50 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर स्टॉकमध्ये बऱ्याच काळापासून विक्रीचा दबाव आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		