2 May 2025 8:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Pan Aadhaar Link Deadline | यावेळी डेडलाईन चुकलात तर 10,000 रुपयांचा दंड भरावाच लागणार, सरकारने दिला शेवटचा अलर्ट

Pan Aadhaar Link Deadline

Pan Aadhaar Link Deadline | पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची नवी मुदत 30 जून 2023 आहे. या डेडलाइनपर्यंत तुम्ही 1000 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंकिंग करू शकता. तसेच त्यानंतर आणखी दंड भरावा लागणार आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ३० जूननंतर लिंकिंगला अधिक दंड भरावा लागू शकतो, असे सांगितले आहे.

केंद्र सरकारने काय म्हटले
नुकतेच निर्मला सीतारामन यांनी पॅन आणि आधार लिंकन केल्याबद्दल च्या दंडाचा बचाव करताना सांगितले की, ही सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत मोफत होती. गेल्या वर्षी १ एप्रिलपासून ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जात होते, ते नंतर १ जुलैपासून वाढवून १००० रुपये करण्यात आले. 30 जून 2023 पूर्वी पॅन आधारशी लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय होईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. तसेच त्यानंतर लिंकिंगवरील दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे.

किती असेल दंड?
प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७२ बी नुसार १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. पॅन निष्क्रिय झाल्यास तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरणे असो किंवा बँक खाते उघडणे असो, या सर्वांवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर क्लेम घेण्यास अडचण येणार आहे.

कोणाला बंधनकारक नाही
केवळ आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयमधील रहिवाशांसाठी पॅन-आधार लिंक करणे आवश्यक नाही. त्याचबरोबर अनिवासी व्यक्तीलाही आधार-पॅन कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. याशिवाय ज्यांचे वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे किंवा भारताचे नागरिक नाहीत त्यांच्यासाठी लिंकिंग बंधनकारक नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pan Aadhaar Link Deadline after that 10000 penalty check details on 09 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pan Aadhaar Link Deadline(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या