3 May 2024 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची प्रतीक्षा संपली, लवकरच IPO धमाका, पहिल्याच दिवशी मालामाल, GMP पहा

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | टाटा समूह तब्बल 20 वर्षानंतर आपल्या एका कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला SEBI ने मंजुरी दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट जबरदस्त कामगिरी करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 250 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतात. गुंतवणुकदार मागील अनेक महिन्यापासून या कंपनीच्या आयपीओची प्रतीक्षा करत होते. आता लवकरच त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये प्रवर्तक असलेली टाटा मोटर्स कंपनी IPO च्या माध्यमातून आपले शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

सध्या टाटा मोटर्स कंपनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल घोषित करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर लाँच होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ सध्या लाँच झाला, तर टाटा मोटर्स कंपनीला आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल 2-3 आठवड्या नंतर जाहीर करावे लागतील.

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी आणि टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी काही भाग राखीव ठेवण्यात येणार आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार एकूण IPO ऑफरच्या 10 टक्के भाग हा टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरधारकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Technologies IPO today on 30 October 2023

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x