7 May 2024 9:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

ईशान्य मुंबईसह राज ठाकरेंच्या मुंबईत २ सभा

MNS, Raj Thackeray, Sanjay Dina Patil

मुंबई : ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्या महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाविरोधात सभांचा धडका लावला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल करत आहेत. सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंची तोफ आता मुंबईत देखील धडाडणार आहे. २३ एप्रिल रोजी शिवडी येथे आणि २४ एप्रिल रोजी भांडूप येथे राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्याशिवाय २५ एप्रिल रोजी पनवेल येथे आणि २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावत राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात प्रचार सुरू केला आहे. राज ठाकरें यांच्या सभांचा समाज माध्यमांवर चांगलाच बोलबाला सुरू आहे. ईशान्य मुंबईतून शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने उमेदवार घोषित केला नव्हता. शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादात अखेर भाजप नगरसेवक मनोज कोटक यांची लॉटरी लागली. मात्र असं असलं तरी ईशान्य मुंबईतील भाजपमधील अंतर्गत विरोधक, शिवसेनेच्या राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा आणि त्यात बऱ्याच भागात मनसेचं प्राबल्य असल्याने मनोज कोटक यांची डोकं दुखी वाढली आहे. त्यात राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांच्या सारखा कार्यकर्त्यांची फौज असलेला आणि जवळपास सर्वच थरातून पाठिंबा असलेला उमेदवार दिल्याने भाजपचा केवळ गुजराती मतदार भरोसे मार्ग अत्यंत कठीण आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार असून त्याचा फायदा थेट संजय दीना पाटील यांना होऊ शकतो.

२४ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे मुंबईतील काळाचौकी अभ्युदयनगर येथे आयोजन केले होते. तेथे मात्र मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारात निवडणूक आयोगानं मनसेला स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेण्यास सांगत चेंडू पालिकेकडे टोलवला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x