12 May 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

पवार विरोधक की विरोधकांचे विरोधक?, राज्यात भाजप संकटात, पण कर्ज-संशयाच्या भोवऱ्यातील उद्योग सोडून अदानींच्या विरोधकांशी भेटी-गाठी

Industries Gaitam Adani

Adani Meet Pawar | महाराष्ट्रात २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये निरनिराळे सर्व्हे आणि अगदी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत देखील भाजपाला मोठा धक्का बसणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का किंवा भाजपची पुन्हा महाराष्ट्रात सत्ता येणार का याची सर्वाधिक चिंता गौतम अदाणींना सतावू लागल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदाणींची आज गुरुवारी (२० एप्रिल २०२३) भेट झाल्याची बातमी समोर आली. उद्योगपती गौतम अदाणी स्वतः शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींचा संबंध काय, असा सवाल केला. त्यावरून देशभर एकच गजहब झाला. अदानींकडील २० हजार कोटी कोणाचे असा सवाल विचार विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेची मागणी केली. अशातच ६ एप्रिलला अधिवेशन संपलं.

अदाणी संकटात आणि पवार ऍक्शन मोडमध्ये
७ एप्रिलला शरद पवारांनी अदाणी समूहाच्या मालकीच्या एनडीटीवीला मुलाखत दिली आणि जेपीसीची मागणी व्यवहार्य नसल्याचा दावा केला. एकप्रकारे पवारांनी विरोधकांच्या मागणीतली हवाच काढून घेतल्याचं म्हटलं गेलं. राहुल गांधी, उद्धव ठाकरे जेपीसीच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पवारांनी एक पाऊल मागे घेतलं.

पवार विरोधक की विरोधकांचे विरोधक?
मागील काही दिवसांपासून शरद पवारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर राज्यात नव्हे तर देशभरातील विरोधक आता संशय घेऊ लागले आहेत. मोठ्या पवारांच्या या राजकीय हालचालींमुळे त्यांना आगामी निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. पवारांना नेमका राष्ट्रवादी पक्ष वाचवायचा आहे की अदानी ग्रुप यावर देखील संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील अनेक मोठ्या पत्रकारांच्या व्यक्तिगत युट्युब चॅन्सलवरील चर्चेत गौतम अदाणींचा देखील स्वार्थ आणि आर्थिक रसद असते असे मुद्दे देखील समोर आले होते.

सध्या महाराष्ट्र, मुंबई आणि गुजरात असे अदाणींसंबंधित अनेक प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत. त्यामुळे देशात, महाराष्ट्रात आणि मुंबईत भाजप सत्तेत असणं अदानी समूहासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं म्हटलं जातंय. भविष्यात मुंबईच महत्वाचं वेगाने कमी करण्यासंबंधित धक्कादायक हालचाली सुरु झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय पक्ष खिशात असणं गरजेचं आहे. आवाज उठवेल असा शिवसेना पक्ष आधीच फोडला गेलाय. दुसरीकडे, राज ठाकरेंच्या घरी लंच करून तिथेही भाजप विरोधाची राजकीय शांतता निर्माण केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Industries Gaitam Adani meet Sharad Pawar today check details on 20 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Industries Gaitam Adani(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या