 
						Vodafone Idea Share Price Today | टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन-आयडिया’ चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारतातील प्रसिद्ध उद्योजक ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना कंपनीच्या संचालक मंडळात सामील करण्यात आले आहे. बिर्ला यांची ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना दोन वर्षांपूर्वी ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. (Vodafone Idea Limited)
शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीचे बाजार भांडवल 32,000 कोटी रुपये होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 6.06 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2023 मध्ये ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के वाढले आहे.
मागील एका वर्षात हा स्टॉक 35.50 टक्के आणि मागील पाच वर्षात 85 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी हा स्टॉक 204 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून, सध्याच्या किंमतीवर आला आहे. स्टॉक आतापर्यंत 97 टक्क्यांनी घसरला आहे. ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत 204 रुपये होती. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 2.40 रुपये होती.
आदित्य बिर्ला समूहाच्या मालकीच्या ‘अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड’ कंपनीचे माजी सीईओ ‘कृष्णा किशोर माहेश्वरी’ यांनी वैयक्तिक कारणासाठी गैर कार्यकारी संचालक पद त्याग केला होता. ‘व्होडाफोन-आयडिया’ दूरसंचार कंपनीला भारत सरकारकडून दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 16,133 कोटी रुपयांहून अधिक व्याज देय रकमेचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		