
Apcotex Share Price| ‘अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज’ या सिंथेटिक रबर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 14 वर्षांत 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना लखपती बनवले आहे. मात्र आता हा स्टॉक 11 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून स्टॉकमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. यामुळे ब्रोकरेज फर्मने स्टॉकचे रेटिंग कमी केले आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 496.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
दलालांनी दिले विक्रीचे रेटिंग :
एपकोटेक्स ही केमिकल कंपनी असून सिंथेटिक रबर आणि सिंथेटिक लेटेक्स बनवण्याचे काम करते. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजच्या अहवालानुसार नायट्रिल लेटेक्स आणि ग्लोव्ह उद्योगात अल्प-मध्यम कालावधीत मंदी येण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन प्लांट्सच्या क्षमतेचा वापर देखील मंद गतीने चालले. मालवाहतुकीचे दर आता सामान्य झाले आहेत, त्यामुळे पुढील काळात Nitrile Butadiene रबर आयातीवर किमतीचा दबाव पाहायला मिळेल.
या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने नजीकच्या काळात या कंपनीच्या व्यवसायावर नकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 24 टक्के मजबूत झाले आहेत. या सुधारणेमुळे भविष्यात स्टॉकमध्ये लक्षणीय वाढ दिसणे अवघड आहे. म्हणून तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 440 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
ऍपकोटेक्स स्टॉकचा मल्टीबॅगर परतावा :
8 मे 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात शेअरची किंमत 11926 टक्क्यांनी वाढून 493.05 रुपयांवर पोहचली आहे. मागील 14 वर्षात या कंपनीच्या शेअरने 80 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर एक कोटी रुपये परतावा दिला आहे. 2 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 678 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते.
तथापि यानंतर शेअर्सची रॅली थांबली आणि अवघ्या 8 महिन्यांत 14 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत शेअरची किंमत 41 टक्क्यांनी घसरून 398 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर आली होती. नंतर स्टॉक 24 टक्के रिकव्हर झाला, मात्र अजून ही शेअरची किंमत उच्चांक पातळी किमतीच्या तुलनेत 27 टक्के डिस्काउंटवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.