
Veerkrupa Jewellers Share Price Today | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी जून 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारात स्टॉक लिस्ट झाल्यापासून आतपर्यंत गुंतवणूकदारांनी मजबूत परतावा कमावला आहे. आता ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे.
Veerkrupa Jewellers Limited Stock Price Today on NSE & BSE
कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. या सोबत वीरकृपा ज्वेलर्स कंपनी 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन देखील करणार आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 82.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख :
‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 4 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि सोबत कंपनी 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजित करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 16 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 146 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 24.40 रुपये होती.
एका वर्षात दिला 238 टक्के परतावा :
वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 238 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 4 मे 2023 रोजी 86.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्स 27 रुपये किमतीवर वाटप केले होते. तर कंपनीचे शेअर्स18 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.