
Rane Engine Valve Share Price | मागील पाच दिवसात ‘राणे इंजिन व्हॉल्व्ह’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 36.48 टक्के वाढले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 314.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एका आठवड्यापासून स्टॉक तेजीत :
‘राणे इंजिन व्हॉल्व्ह’ या कंपनीचे शेअर्स मागील एका आठवड्यापासून जबरदस्त तेजीत ट्रेड करत आहेत. या दरम्यान गुंतवणूकदारांनी 43 टक्के परतावा कमावला आहे. मागील एका महिन्यात ‘राणे इंजिन व्हॉल्व्ह’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
राणे इंजिन्स कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकताच जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 4.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या तिमाहीत कंपनीने 24.7 टक्क्यांच्या वाढीसह 136.50 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 109.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
जानेवारी ते मार्च या तिमाहीत ‘राणे इंजिन व्हॉल्व्ह’ कंपनीला 0.01 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण महसूलात 29.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि कंपनीने 499.6 कोटी रुपये महसूल कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 385 कोटी रुपये होता. त्याच वेळी परकीय ग्राहकांकडून मागणी मजबूत असल्याने कंपनीची निर्यात 27 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.