19 May 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Sterling Tools Share Price | 1 वर्षात 200 टक्के परतावा देणाऱ्या 'स्टर्लिंग टूल्स' कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, खरेदी करावा?

Sterling Tools Share Price

Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ या वाहनांसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाचे नट-बोल्ट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यासपपासून स्वस्त होत आहेत. एकीकडे मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअर ने लोकांना 192.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर दुसरीकडे मागील एक महिन्यापासून हा स्टॉक 19.58 टक्के घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.40 टक्के घसरणीसह 349.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लाभांश वाटपाची घोषणा :
‘स्टर्लिंग टूल्स’ कंपनीने 8 मे 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीने लाभांश वाटपाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक शेअरवर 2 रुपये लाभांश जाहीर केला आहे. स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश प्रस्तावावर भागधारकांची मंजुरी घेतली जाईल.

शेअरची वाटचाल :
स्टर्लिंग टूल्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 12 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 116.05 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर अवघ्या 11 महिन्यांत शेअरमध्ये 294 टक्क्यांची वाढ होऊन 12 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 456.75 रुपयांवर पोहचला आहे. शेअरमधील विक्रीच्या दबावामुळे स्टॉक आतापर्यंत 20 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. एक वर्षाच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत स्टॉक 213 टक्क्यांनी वर ट्रेड करत आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
स्टर्लिंग टूल्स कंपनीने सोमवारी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. जानेवारी ते मार्च 2023 मध्ये कंपनीने 212.66 कोटी रुपये कमाई केली आहे. ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत 25.03 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 13 टक्क्यांच्या वाढीसह 7.77 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर कंपनीचे एकूण उत्पन्न 51.16 टक्के वाढीसह 774.88 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. त्याच वेळी कंपनीचा निव्वळ नफा 87.48 टक्के वाढीसह 47.87 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling Tools Share Price today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

#Sterling Tools Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x