1 May 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

Shipping Corporation of India Share | मालामाल करणाऱ्या सरकारी कंपनीबाबत एक बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?

Shipping Corporation of India Share

Shipping Corporation of India Share | ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत होते. काल हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 102.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळाली आहे.

मार्च 2023 च्या तिमाहीत या सरकारी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 3 पट झाली आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 99.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 151.30 रुपये होती.

कंपनीची तिमाही कामगिरी :
‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या तिमाही नफ्यात 184 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या नफ्यात मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 183.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीने तिमाही काळात 359.83 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 126.74 कोटी रुपये नफा कमावला होता.

मार्च 2023 तिमाहीत ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीने वार्षिक आधारावर 7.2 टक्के वाढीसह 1452.21 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत कंपनीने 1355.12 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

भारत सरकार भाग भांडवल कमी करणार :
भारत सरकारची मालकी असलेल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीमधून सरकार काही हिस्सा विकण्याची चर्चा शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर सरकार या महिन्यात शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या खाजगीकरणासाठी आर्थिक बोली आमंत्रित करण्याची शक्यता आहे.

‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीत सरकारने 63.75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 4623 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 79.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shipping Corporation of India Share Today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

Shipping Corporation of India Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x