2 May 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Asian Paints Share Price | एशियन पेंट कंपनीच्या शेअरवर 2515 टक्के डिव्हीडंड जाहीर केला, गुंतवणूकदार मालामाल झाले

Asian Paints Share Price

Asian Paints Share Price | ‘एशियन पेंट्स’ कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 1,234 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आर्थिक निकालात दिली आहे. वार्षिक आधारावर एशियन पेंट कंपनीच्या नफ्यात 45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एशियन पेंट्स कंपनीने मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत 850 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

या कंपनीच्या संचालक मंडळाने मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2125 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 21.25 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी एशियन पेंट कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 3,131.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश तपशील :
2022-23 या आर्थिक वर्षासाठी एशियन पेंट कंपनीने प्रति शेअर 25.65 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. एशियन पेंट कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 4.40 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. मार्च तिमाहीचे लाभांश वाटपासाठी एशियन पेंट्स कंपनीने 9 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनी 30 जून 2023 रोजी किंवा नंतर गुंतवणूकदारांच्या खत्यात लाभांश जमा करेल. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, कंपनीने 1915 टक्के म्हणजेच प्रति शेअर 19.15 रुपये लाभांश वाटप केला होता.

जानेवारी-मार्च 2023 या तिमाही कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत एशियन पेंट्स कंपनीने 11 टक्क्यांच्या वाढीसह 8787 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत एशियन पेंट कंपनीने 7893 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीचा PBDIT मार्च 2023 तिमाहीत 29 टक्के वाढीसह 1865 कोटी रुपयेवर पोहचला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीचा PBDIT 1443 कोटी रुपये होता. मार्च 2023 मध्ये संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण सेल्स 34,368 कोटी रुपयेवर पोहचला आहे. तर कंपनीचा नफा 35 टक्के वाढीसह 4106 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Asian Paints Share Price today on 12 May 2023.

हॅशटॅग्स

Asian Paints Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x