17 May 2024 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

VIDEO Congress Party | प्रभु! कर्नाटक में सत्य की जीत हुई, हे हनुमान अब मध्य प्रदेश की और प्रस्थान करो, जय श्रीराम!!!!!

VIDEO Congress Party

VIDEO Congress Party | कर्नाटक निवडणुकीनंतर आता हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ होईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठी मुसंडी मारेल असा अंदाज स्थानिक वृत्तपत्रांनी मांडला आहे. तसेच मध्य प्रदेशात भाजपमध्ये मोठे अंतर्गत कलह वाढल्याने त्याचाही मोठा फटका बसेल अशी शक्यता आहे.

त्यामुळेच मागील काही दिवस मुख्यमंत्री शिवराज सिंग चोहान दिल्लीच्या फेऱ्या मारत आहेत. कारण मध्य प्रदेशातील भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचे संकेत मिळाल्याने ते आधीच काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसात अनेक मोठ्या भाजप नेत्यांनी काँग्रेस नेते आणि माजी मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर एमपी काँग्रेसने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये भगवान श्रीराम आणि भक्त हनुमान यांचे संभाषण दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेस कर्नाटकात सत्याचा विजय झाल्याचे सांगत आहे. त्याचवेळी भगवान श्रीराम बजरंगबलीला मध्य प्रदेशला जाण्याचा आणि भक्त कमलनाथ यांचा विजयध्वज फडकवण्याचा आदेश देताना दिसतात. त्यामुळे काँग्रेसची रणनीती सुद्धा निश्चित झाली असून ते जोरदार कामाला देखील लागले आहेत.

कर्नाटक निवडणुकीतील विजयाबद्दल मध्य प्रदेश काँग्रेस उत्सुक आहे. भाजपला राज्यात ५० जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा काँग्रेसने ट्विटद्वारे केला आहे. कर्नाटकात काँग्रेसला १३६ जागा मिळाल्या, काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या, मध्य प्रदेशात भाजपला ५० जागा जिंकणे अशक्य आहे. सत्य भक्कम आहे, आम्ही जिंकत आहोत असं काँग्रेसने आत्मविश्वासाने म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO Congress Party Madhya Pradesh trending on social media check details on 14 May 2023.

हॅशटॅग्स

#VIDEO Congress Party(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x