14 December 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

PM-WANI Wi-Fi योजनेला मंजुरी | देशात 1 कोटी डेटा सेंटर उघडणार

PM WANI WiFi, scheme launched, no License, no registration, no fee

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार आदी मंत्री उपस्थित होते. त्यांनीच नंतर ही माहिती दिली. देशात एक कोटी डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. या योजनेला प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस योजना असं नाव देण्यात आलं असून त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस (PDO) उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे.

याचबरोबर, संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले, त्यावेळी संघटित क्षेत्रात 6 कोटी रोजगार होते, आता त्यामध्ये वाढ होऊन 10 कोटी रोजगार मिळाले आहेत. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने आसामच्या अरुणाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये यूएसओएफ (USOF ) योजनेला मान्यता दिली आहे.

 

News English Summary: A cabinet meeting was held today under the chairmanship of Prime Minister Narendra Modi. The PM-WANI Wi-Fi scheme has been approved and one crore data centers will be set up in the country. The scheme has been dubbed as ‘Prime Voice Wi-Fi Access Interface’. The scheme will provide free Wi-Fi in all parts of the country and will lead to a Wi-Fi revolution in the country, sources said.

News English Title: PM WANI WiFi scheme no License no registration no fee news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x