18 May 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Karnataka Congress CM | डीके शिवकुमार दिल्लीला रवाना, मी कोणालाही फसवणार नाही, काँग्रेस पक्ष माझं कुटुंब

Karnataka Congress CM

Karnataka Congress CM | कर्नाटकात काँग्रेसने बहुमताने निवडणूक जिंकली असली तरी राज्यात सरकार प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी कडवी झुंज सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार मंगळवारी सकाळी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी कर्नाटकच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने एक ठराव मंजूर करून राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवली.

डिके शिवकुमार काय म्हणाले?
विमानतळावर रवाना होण्यापूर्वी आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की, “काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसांनी मला एकट्याने येण्याची सूचना केली आहे, मी एकटाच दिल्लीला जात आहे. लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकणे हे आमचे या पुढचे आव्हान आहे. काँग्रेस पक्ष आमचे एकत्रित घर आहे, मला इथे पक्षात विभागणी करायची नाही. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी केपीसीसीचे प्रमुख डीके शिवकुमार पुढे म्हणाले की, सोनिया गांधी आमचे आदर्श आहेत. काँग्रेस हे सर्वांचे कुटुंब आहे. आपली राज्यघटना अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण सर्वांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे.

मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे. मात्र, शिवकुमार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सोमवारी सायंकाळी आपला राष्ट्रीय राजधानीचा दौरा रद्द केला, ज्यामुळे पक्षात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा सुरू झाली. तर सिद्धरामय्या सोमवारपासून दिल्लीत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित आमदारांशी संवाद साधणाऱ्या काँग्रेसच्या तीन केंद्रीय निरीक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना माहिती देऊन आपला अहवाल सोमवारी सादर केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी बेंगळुरूयेथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याचा अधिकार दिला. मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात कडवी लढत आहे. २२४ सदस्यांच्या विधानसभेच्या १० मे रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळवली. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येबाबत अटकळ बांधली जात असतानाच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे संख्याबळ १३५ आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाने १३५ जागा जिंकल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Karnataka Congress CM Selection check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka Congress CM(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x