मनसे नंतर भाजपात मग शिवसेनेत मग शिंदे गटात जाणाऱ्या पलटूराम खासदार सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट? आठवले शिर्डीतून लोकसभा लढवणार

Ramdas Athawale to Contest Loksabha Elections 2024 from Shirdi | आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रिपाई आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडली, याच पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 28 मे रोजी रिपाई आठवले पक्षाचं शिर्डीत राज्य अधिवेशन पार पडणार आहे. रिपाई आठवले पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे शिर्डीत घेणार असल्याची माहिती राज्य सह संघटक अशोक नागदेवे यांनी दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापासूनच आठवले गटाकडून लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.
शिंदे समर्थक खासदाराचा पत्ता कट?
दरम्यान, शिर्डी मतदारसंघातून मागच्या दोन्ही टर्ममध्ये सदाशिव लोखंडे खासदार झाले आहेत. सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या १२ खासदारांपैकी एक आहेत. पण आधी मनसेत, नंतर भाजपात आणि ऐनवेळी शिवसेनेत आलेले सदाशिव लोखंडे २०१४ ला पहिल्यांदा खासदार कसे झाले त्याचा किस्साही इंटरेस्टिंग आहे. सदाशिव लोखंडे हे फक्त १७ दिवसात खासदार झाले होते आणि त्यांनी नगर दक्षिणेतून येऊन नगर उत्तरमध्ये दणदणीत विजय मिळवला होता.
असा आहे पक्ष बदलण्याचा इतिहास
सदाशिव लोखंडे हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या दिघोळ गावचे आहेत. १९९५, १९९९ आणि २००४ असं सलग तीन वेळा ते कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार झाले. हा तोच मतदारसंघ आहे जिथे सध्या रोहित पवार आमदार आहेत आणि त्याआधी भाजपचे राम शिंदे होते.. हा मतदारसंघ तेव्हा राखीव होता. पण २००९ ला हा मतदारसंघ खुला झाला, तेव्हा राज ठाकरे यांच्या मनसेची प्रचंड हवा होती आणि त्याचाच फायदा घ्यायचं ठरवलं सदाशिव लोखंडेंनी २००९ ला मनसेत प्रवेश करुन कुर्ला मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पराभव झाला.. मनसेतल्या पराभवामुळे लोखंडेंची प्रचंड निराशा झाला आणि ते पुन्हा भाजपात परतले. पुढचे पाच वर्ष सक्रिय होऊन त्यांनी भाजपचं काम केलं.
२०१४ ला इकडे शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऐनवेळी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे तेच भाऊसाहेब वाकचौरे आहेत, ज्यांनी रामदास आठवलेंचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात २००९ ला पराभव केला होता. वाकचौरेंनी तर ऐनवेळी पक्ष सोडला, पण २०१४ ला मोदी लाट आणि महायुतीत निवडणूक लढत असलेल्या शिवसेनेलाही अनुसूचित जातीच्या उमेदवाराची गरज होती. अनेक पर्यायांची चाचपणी केल्यानंतर शिवसेनेकडून बबनराव घोलप यांचं नाव निश्चित झालं आणि त्यांनी शिर्डी मतदारसंघात संपर्क अभियान सुरू केलं. मात्र तांत्रिक अडचणींमुळे घोलप यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.
इथेच सदाशिव लोखंडेंनीही संधी शोधली. २०१४ ला सदाशिव लोखंडे यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना ऐनवेळी शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. शिर्डी मतदारसंघात जनसंपर्क नसतानाही अवघ्या १७ दिवसांत शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना खासदार केलं. त्यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला. पण लोखंडे फक्त १७ दिवसात खासदार झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: RPI Chief will contest Loksabha Election 2024 from Shirdi check details on 19 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL