
BPCL Share Price | ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ या सरकारी कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 6,478 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
सेबीला दिलेल्या माहितीमध्ये
बीपीसीएल कंपनीने सोमवारी सेबीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत BPCL कंपनीने 2,501 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. रिफायनिंग आणि फ्युएल मार्केटिंग मार्जिनमध्ये जबरदस्त सुधारणा झाल्यामुळे BPCL कंपनीच्या तिमाही नफ्यात वाढ पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी BPCL कंपनीचे शेअर्स 0.068 टक्के घसरणीसह 366.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनी देणार लाभांश :
बीपीसीएल कंपनी आपल्या तिमाही निकालासोबत गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना 4 रुपये लाभांश दिला जाणार आहे.
1,807 कोटी रुपये निव्वळ नफा
चौथ्या तिमाहीच्या उत्कृष्ट निकालांमुळे BPCL कंपनीने संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,807 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती स्थिर असल्याने कंपनीला तोटा भरून काढण्यास मदत झाली होती.
मागील 6 महिन्यांत 16 टक्के परतावा
बीपीसीएल कंपनीने मागील वर्षी एप्रिल 2022 पासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ केली नाही. तरी देखील आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे दुसऱ्या सहामाहीत कंपनीच्या रिफायनिंग मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत BPCL कंपनीच्या शेअरची किंमत 16 टक्क्यांनी वर गेली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BPCL कंपनीचे शेअर्स 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 362.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.