29 April 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

तेज बहादूर यादव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बीएफएस’चे निलंबित जवान तेज बहादूर यादव यांची याचिका फेटाळली आहे. वाराणसीतील महाआघाडीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांची उमेदवारी रद्द झाली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले, आम्हाला या प्रकरणाची दखल घेण्यासाठी याचिकेत काही तथ्य आहे असे वाटत नाही. तर, तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले,’ ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे त्यामुळे १९ मेची निवडणूक लढण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. तसेच उमेदवारी रद्द झाल्यानंतर आम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी योग्य संधी देण्यात आली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, वाराणसीमध्ये १९ मे रोजी मतदान होणार आहे. तेज बहादूर यादव यांनी २९ एप्रिल रोजी समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र १९ एप्रिल २०१७ रोजी तेज बहादूर यांना बीएसएफमधून निलंबित केल्याचा आधार घेत १ मे या दिवशी रिटर्निंग ऑफिसकडून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. परंतु निवडणूक आयोगाकडे असे कोणतेही प्रमाण पत्र नाही की तेज बहादूर यांना भ्रष्टाचार किंवा राज्याच्या विरोधातील कोणत्या कृत्यामुळे काढण्यात आले. तेज बहादूर यांनी म्हटले आहे की, मी उमेदवारी अर्जासह निलंबित पत्रकही जोडले, ज्यात कारणही लिहिले होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x