9 May 2025 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK
x

MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार

Highlights:

  • MM Forgings Share Price
  • एमएम फोर्जिंग शेअरची सध्याची किंमत
  • एमएम फोर्जिंग लाभांश इतिहास
  • एमएम फोर्जिंग्ज शेअरचा इतिहास – 4900 टक्के परतावा
MM Forgings Share Price

MM Forgings Share Price | ‘एमएम फोर्जिंग’ या कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश रूपाने मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या ऑटो ऍन्सिलरी कंपनीच्या स्टॉकने 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 6 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 मे 2023 हा दिवस निश्चित केला होता.

एमएम फोर्जिंग शेअरची सध्याची किंमत

एमएम फोर्जिंग कंपनीच्या संचालक मंडळाने 17 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत शेअर धारकांना प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनी लाभांश रक्कम 15 जून किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 856.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एमएम फोर्जिंग लाभांश इतिहास

एमएम फोर्जिंग या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त लाभांश फायदा मिळवून दिला आहे. हा स्मॉल कॅप स्टॉक 2007 पासून नियमितपणे आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करत आहे. या पूर्वी एमएम फोर्जिंग कंपनीने 6 जून 2022 रोजी एक्स लाभांश डेट वर ट्रेड केला होता. त्यावेळी कंपनीने शेअर धारकांना 6 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप केला होता. त्याचप्रमाणे 1 जुलै 2021 रोजी, देखील या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने प्रति शेअर 5 अंतरिम लाभांश वाटप केला होता.

एमएम फोर्जिंग्ज शेअरचा इतिहास – 4900 टक्के परतावा

एमएम फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्सनी कोविड महामारी नंतरच्या रिबाउंडमध्ये गुंतवणुकदारांना मालामाल केले होते. या स्मॉल कॅप स्टॉकने मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. 29 मे 2020 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 188.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 856.85 रुपये किमतीवर पोहचला आहे.

या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 450 टक्के परतावा मिळाला आहे. मागील दहा वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 42 रुपयेवरून वाढून 856 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 1900 टक्के वाढली आहे. मागील 14 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 17 रुपयेवरून वाढून 856 रुपये प्रति शेअरवर पोहचली आहे. तर या काळात लोकांनी 4900 टक्के परतावा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MM Forgings Share Price today on 30 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

MM Forgings Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या