15 December 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स खरेदी करावा? शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 17.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते येस बँकेचे निकाल शनिवारी जाहीर होतील. आणि या आर्थिक निकालामुळे येस बँकेच्या मूलभूत गोष्टींमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

तज्ञांच्या मते या खाजगी बँकेच्या मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 1.76 टक्के वाढीसह 17.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

येस बँक शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस फिर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल शनिवारी जाहीर करणार आहे. तज्ञांच्या मते या निकालामुळे येस बँकेच्या फंडामेंटल्समध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, की येस बँकेचे मार्जिन आणि निव्वळ व्याज दुसऱ्या तिमाहीत वाढण्याची शक्यता आहे. म्हणून अनेक तज्ञ येस बँक स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 22 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांच्या मते येस बँकेच्या शेअर्ससाठी 18.50 रुपये किंमत रेझिस्टांस पातळी आहे. एकदा जर का येस बँक स्टॉकने ही किंमत पातळी ओलांडली तर हा स्टॉक 20-22 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये येस बँकेचे शेअर्स आहेत, त्यांना तज्ञांनी 16 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

2023 या वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. येस बँकेचे शेअर्स 2023 या वर्षाच्या सुरुवातीला 21.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 17.85 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 21 October 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x