12 December 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Mishtann Foods Share Price | मिष्ठान्न फूड्स शेअरमध्ये बंपर तेजी, 14 रुपयाचा स्वस्त शेअर भरभरून परतावा देतोय, कारण काय?

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड ही कंपनी बासमती तांदळाच्या विविध प्रकारां संबंधित व्यवसाय करते. मिष्टान फूड्स कंपनी भारतातील एक आघाडीची FMCG कंपनी देखील मानली जाते. (Mishtann Share Price)

मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत कंपनीच्या महसुलात 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणि कंपनीने 294 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्याचप्रमाणे, जून तिमाहीत मिष्टान फूड्स कंपनीने 525 टक्के वाढीसह 69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के वाढीसह 13.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी :

मिष्टान फूड्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नोमुरा सिंगापूर लिमिटेड कंपनीने मिष्टान फूड्स कंपनीमध्ये 1.28 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू असल्याने स्टॉक तेजीत वाढत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिष्टान फूड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 13.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये देखील हा स्टॉक जबरदस्त तेजीत धावत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 3.72 टक्क्यांच्या वाढीसह 14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2022 ते 2023 या आर्थिक वर्षात मिष्टान फूड्स कंपनीने ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये 90 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने याकाळात 490 कोटी रुपये नफा कमावला आहे. त्याचप्रमाणे, मिष्टान फूड्स कंपनीचा PAT 82 टक्के वाढीसह 14 कोटी रुपयेवर पोहचला आहे. 28 मे 2021 रोजी मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2021 ते 223 या काळात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने मागील तिमाहीत कर्ज परतफेड केले आहेत. मागील सलग 5 वर्षांपासून मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स सरासरी वार्षिक 60 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mishtann Foods Share Price today on 20 July 2023.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x