6 May 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Eureka Forbes Share Price | कमाई जोमात! युरेका फोर्ब्स शेअरने 5 दिवसात 26 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा अल्पावधीत कमाई करणार का?

Highlights:

  • Eureka Forbes Share Price
  • शेअर मागील 5 दिवसात 26.44 टक्के वाढला
  • कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ
  • युरेका फोर्ब्स शेअरने गुंतवणुकीवर दिलेला परतावा
Eureka Forbes Share Price

Eureka Forbes Share Price | युरेका फोर्ब्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीमध्ये ट्रेड करत होते. आज युरेका फोर्ब्स स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. काल हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये 14 टक्क्यांच्या वाढीसह 516.95 रुपये या आपल्या तीन महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

शेअर मागील 5 दिवसात 26.44 टक्के वाढला

त्याच वेळी हा शेअर मागील पाच दिवसात 26.44 टक्के वाढला आहे. युरेका फोर्ब्स कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्याने पहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 483.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ

नुकताच युरेका फोर्ब्स कंपनी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत युरेका फोर्ब्स कंपनीने 16.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीचे तुलनेत या तिमाहीत नफा दुप्पट झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत युरेका फोर्ब्स कंपनीने 8.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

तथापि, कमजोर बाजार परिस्थितीमुळे मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 8 टक्क्यांच्या घसरणीसह 508 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार EBITDA मार्जिन मध्ये सुधारणा झाली आहे.

युरेका फोर्ब्स शेअरने गुंतवणुकीवर दिलेला परतावा

युरेका फोर्ब्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 57.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्याच्या कालावधीत युरेका फोर्ब्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 26.44 टक्के वाढली आहे. 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 537.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. तर 20 जून 2022 रोजी या स्टॉकने 282 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

युरेका फोर्ब्स ही कंपनी भारतातील आघाडीची आरोग्य आणि स्वच्छता ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे. युरेका फोर्ब्स कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये व्हॅक्यूम क्लीनर, आणि हवा शुद्धीकरण करणारे उपकरण यासारखे वस्तू उपलब्ध आहेत. कंपनी आपले उत्पादन थेट, किरकोळ, आणि ई-कॉमर्स आणि संस्थात्मक विक्री चॅनेलच्या माध्यमातून बाजारात विकत असते. कंपनीकडे भारतातील सर्वात विस्तृत नेटवर्क सेवापैकी एक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eureka Forbes Share Price today on 1 June 2023.

हॅशटॅग्स

Eureka Forbes Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x