
Centum Electronics Share Price | सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स शेअरने मागील 5 दिवसांत 36.69 टक्के परतावा दिला
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत लोकांना 36.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.63 टक्क्यांच्या वाढीसह 1,047.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1331.58 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.62 टक्के वाढीसह 1,117.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा तिमाही निकाल तपशील
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 35.68 टक्के वाढीसह 316.28 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 233.11 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2022 च्या तिमाहीतील 7.26 कोटी रुपये निव्वळ नफ्याच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 25.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मार्च 2022 च्या तिमाहीतील EBITDA 16.36 कोटी रुपयाच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 206.78 टक्क्यांच्या वाढीसह 50.19 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 6.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 53.47 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकची कामगिरी
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात लोकांना 51.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना 97.52 टक्के नफा मिळवून दिला आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 48 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तर मागील एका वर्षात गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 132 टक्के नफा कमावला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 360 टक्के इतका बंपर नफा कमावला आहे.
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबद्दल थोडक्यात
सेंटम इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक कंपनी मुख्यतः सिस्टम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे डिझाइन, उत्पादन आणि निर्यात करण्याचे काम देखील करते. कंपनी इलेक्ट्रॉनिक प्रणाली, उपप्रणाली, मॉड्यूल, मुद्रित सर्किट बोर्ड असेंब्ली आणि डिझाइन सेवा प्रदान करण्याचे काम देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.