12 December 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Bharat Electronics Share Price | 22 पैशात काय येतं? चॉकलेट किंमतीचा शेअर खरेदी करणाऱ्यांना 1 लाख रुपयांवर मिळाला 6 कोटी रुपये परतावा

Bharat Electronics Share price

Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीला 2023 मधील जुलै आणि ऑगस्ट या दोनच महिन्यांत 3,289 कोटी रुपये मूल्याची संरक्षण आणि गैर-संरक्षण क्षेत्रातील ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 136.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.95 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 134.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ऑर्डर तपशील सविस्तर

नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीला मिळाले हे कॉन्ट्रॅक्ट लो लेव्हल लाइटवेट रडार, सोनार, आयएफएफ सिस्टम, सॅटकॉम सिस्टम, ईओ / आयआर पेलोड, टीआरएम / डीटीआरएम, जॅमर एन्क्रिप्टर, डेटा लिंक सिस्टम, फायर कंट्रोल सिस्टम, निर्देशित ऊर्जा या संबंधित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आहे. यासह भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला रडार, टेलिफोन एक्सचेंज, सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ आणि विविध प्रकारचे रेडिओ, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, एएमसी आणि स्पेअरचा पुरवठा करण्याचे काम देखील मिळाले आहे.

शेअरची कामगिरी

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये 2023 वर्षात 35 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे.

1 जानेवारी 1999 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 22 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 1999 साली या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते, तर आतापर्यंत तुम्हाला 61377 टक्के नफा मिळाला असता. जर तुम्ही 24 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bharat Electronics Share price today on 29 August 2023

हॅशटॅग्स

Bharat Electronics Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x