2 May 2025 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Realme 11 Pro 5G | गुड-न्यूज! रियलमी 11 Pro 5G सीरीज स्मार्टफोनवर 'हे' 4499 रुपयांचे डिव्हाईस फ्री गिफ्ट मिळणार

Highlights:

  • Realme 11 Pro 5G
  • 4499 रुपयांचं फ्री स्मार्टवॉच
  • रियलमी 11 प्रो’ची भारत किंमत किती?
  • स्पेसिफिकेशन्स
Realme 11 Pro 5G

Realme 11 Pro 5G | रियलमी ११ प्रो सीरिजचा स्मार्टफोन ८ जून रोजी भारत ासह जगभरात लाँच होणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी रिअलमी ११ प्रो आणि रियलमी ११ प्रो+ असे दोन फोन सादर करणार आहे. या फोनच्या लाँचिंगपूर्वी त्याची किंमतही समोर आली आहे. आता लीक झालेल्या माहितीमुळे डिव्हाइसची ऑफलाइन प्री-ऑर्डर डेट तसेच प्री-ऑर्डर करताना मिळणारी फ्री गिफ्ट समोर आली आहे.

4499 रुपयांचं फ्री स्मार्टवॉच

टिप्सटर सुधांशु अंभोरे यांनी रिअलमी ११ प्रो सीरिजचे एक पोस्टर भारतीय लाँचिंगपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. पोस्टरनुसार, रियलमी 11 प्रो सीरिज 8 जूनपासून ऑफलाइन प्री-बुक केली जाऊ शकते. या फोनची प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना रियलमी वॉच २ प्रो ४४९९ रुपयांत मोफत मिळणार आहे.

रियलमी 11 प्रो’ची भारत किंमत किती?

प्रसिद्ध टिप्सटर देबायन रॉय यांच्या मते, रियलमी 11 प्रोची किंमत 22,000 ते 23,000 रुपयांच्या दरम्यान असेल. दुसरीकडे, रियलमी 11 प्रो प्लसची किंमत 28,000 ते 29,000 रुपयांच्या आसपास असेल.

स्पेसिफिकेशन्स

* डिस्प्ले: 6.7 इंच कर्व्ड एमोलेड डिस्प्ले, फुल एचडी + (1080 × 2412 पिक्सल) रिज़ॉल्यूशन, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 950 नाइट्स पीक ब्राइटनेस, 50,00,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, एचडीआर10+, 93.65% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो।
* प्रोसेसर: माली जी 68 जीपीयू सह मीडियाटेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसर.
* मेमरी आणि स्टोरेज : १२ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज.
* सॉफ्टवेअर : अँड्रॉइड १३ वर आधारित रियलमी यूआय ४.०
* कॅमेरा : रियलमी ११ प्रो+ मध्ये २०० एमपी सॅमसंग एचपी ३ सेन्सर, ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ एमपी मॅक्रो सेन्सर आहे. तर, रियलमी 11 प्रोमध्ये ओआयएस सपोर्टसह 100 एमपी कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो सेन्सर आहे. रिअलमी ११ प्रो प्लसमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, तर रियलमी ११ प्रोमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
* बॅटरी आणि चार्जिंग : दोन्ही फोनमध्ये 4870 एमएएच बॅटरी, 11 प्रो+ मध्ये 100 वॉट फास्ट चार्जिंग आणि 11 प्रो मध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग असेल.
* ऑडिओ: डॉल्बी अॅटमॉससह स्टिरिओ स्पीकर आहे.
* सिक्युरिटी : इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
* रंग: सनराइज सिटी, स्टारी नाइट ब्लॅक आणि ओएसिस ग्रीन.

News Title : Realme 11 Pro 5G pre-order will get free Realme smartwatch of Rs 4499 check details on 04 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Realme 11 Pro 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या