28 April 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

Stock To Buy | अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा! तज्ज्ञांनी दिला 'हा' शेअर खरेदीचा सल्ला, स्टॉक डीटेल्स पहा

Highlights:

  • Stock To Buy
  • पर्ल ग्लोबल लिमिटेड शेअर
  • कंपनीची मूलभूत तत्त्वे
  • तिमाही निकाल तपशील
Stock To Buy

Stock To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजार एक दिवसा तेजीत असतो, तर दुसऱ्या दिवशी मंदीत असतो. अशा काळात गुंतवणूकदारांमधे कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करावी, याबाबत संभ्रम आहे. आज या लेखात आपण अशा स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यावर तज्ञांनी सखोल संशोधन करून लक्ष किंमत निश्चित केली आहे. आणि गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

आपण ज्या स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, त्याचे नाव आहे, पर्ल ग्लोबल. ही कंपनी 1987 पासून कार्यरत आहे. भारताव्यतिरिक्त या कंपनीने आपला व्यवसाय व्हिएतनाम, बांगलादेश, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्येही पसरवला आहे. आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के वाढीसह 543 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पर्ल ग्लोबल लिमिटेड शेअर

* रेटिंग – खरेदी करा
* शेअरची सध्याची किंमत – 543.00 रुपये
* शेअरची टार्गेट प्राईस – 590/630 रुपये
* कालावधी – 4/6 महिने

शेअर बाजारातील तज्ञानी दिलेल्या माहितीनुसार पर्ल ग्लोबल कंपनीचे 19 उत्पादन युनिट चालू आहेत. या कंपनीची उत्पादन क्षमता चांगली आहे. या कंपनीची देशांतर्गत विक्री देखील चांगल्या प्रमाणात वाढली आहे. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीची मूलभूत तत्त्वे

पर्ल ग्लोबल कंपनीचा स्टॉक 8 च्या पीई मल्टिपलवर ट्रेड करत आहे. या कंपनीवर खूप कमी कर्ज आहे. पर्ल ग्लोबल कंपनीचा इक्विटीवर परतावा 21 टक्के असून लाभांश प्रमाण 1.5 टक्के आहे. मागील 3 वर्षांत पर्ल ग्लोबल कंपनीच्या विक्रीत 23-24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात कंपनीच्या नफ्यात 43 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

तिमाही निकाल तपशील

मार्च 2022 मध्ये पर्ल ग्लोबल कंपनीने 22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2023 मध्ये या कंपनीने 53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. पर्ल ग्लोबल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 66 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय परकीय गुंतवणुकदारांनी कंपनीचे 5 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Stock To Buy for investment on 06 June 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x