15 May 2024 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअरमध्ये अस्थिरता वाढली, स्टॉकमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ काय म्हणाले?

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. ट्रेडिंग दरम्यान अदानी विल्मर कंपनीचा स्टॉक 418.60 रुपये या मागील बंदच्या तुलनेत 4.63 टक्के वाढीसह 438 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज मात्र पुन्हा स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 420.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका वर्षात अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 28.13 टक्के घसरले आहेत. तर 2023 या वर्षात हा स्टॉक 30.46 टक्के खाली आला आहे. तज्ज्ञांच्या मते अदानी विल्मर स्टॉक मजबूत सुधारणेच्या टप्प्यातून जात आहे. हा स्टॉक पुढील काळात आणखी खाली येण्याची शक्यता आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

23 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 841.90 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 फेब्रुवारी 2023 रोजी या स्टॉकने 327 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

हा स्टॉक स्टॉक अजूनही आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा 49 टक्के खाली ट्रेड करत आहे. 24 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या अदानी समूहाविरोधातील हिडेनबर्ग अहवालात अदानी समूहाच्या इतर सर्व शेअर्ससह अदानी विल्मर स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण झाली होती.

जर तुम्ही अदानी विल्मर कंपनीच्या शेअरचे दैनिक चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकमध्ये 442 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार आहे. या शेअरने 413 रुपये किमतीवर मजबूत आधार निर्माण केला आहे. गुंतवणूकदारांनी स्टॉकमधील प्रतिकार मोडला तरच खरेदी करावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

मार्च 2023 तिमाहीत अदानी विल्मर कंपनीच्या नफ्यात 60 टक्के घट पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत अडणी विल्मर कंपनीने 234.29 कोटी रुपये नफा कमावला होता. तर या तिमाहीत कंपनीने फक्त 93.6 कोटी रुपये नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत 14,917.2 कोटीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूलात 7 टक्के वार्षिक घट पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीने 13,872.6 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Wilmar Share Price today on 16 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x