
Sugar Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. साखर कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीचा ट्रेण्ड आणखी काही सुरू राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 354.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्यवहाराअंती उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 12.37 टक्क्यांच्या वाढीसह 342.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 23 जून रोजी उत्तम शुगर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 342.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
धामपूर शुगर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 292.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी 23 जून रोजी धामापूर शुगर कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 288.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5.20 टक्के वाढीसह 127.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते शुक्रवारी हा स्टॉक 4.66 टक्के घसरणीसह 121.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारी 3.04 टक्क्यांच्या वाढीसह 94.48 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 2.80 टक्के घसरणीसह 91.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारी बजाज हिंदुस्थान शुगर स्टॉक 4 टक्के वाढीसह 16.89 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ते शुक्रवारी हा स्टॉक 5.62 टक्के घसरणीसह 15.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, वाढत्या मागणीसह हवामानाच्या कमकुवत अंदाजामुळे साखरेच्या जबरदस्त दरात वाढ होऊ शकते. एंजल वनचे तज्ञ म्हणाले की, जगभरातील साखरेच्या किमती स्थिर झाल्यामुळे आणि यूएस शुगर फ्युचर्स मार्केटमधील उच्च पातळीमुळे उत्तम शुगर, अवध शुगर, उगर शुगर वर्क्स, यासारख्या साखर कंपन्याचे शेअर्स चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. बलरामपूर चिनी मिल्स कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आणि तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.