19 May 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Realme Narzo 60 5G | गोल कॅमेरा असलेला स्वस्त Realme Narzo 60 5G स्मार्टफोन जबरदस्त डिझाईनसह लाँच होतोय

Realme Narzo 60 5G

Realme Narzo 60 5G | चिनी टेक ब्रँड रियलमी भारतीय बाजारात आपले लेटेस्ट नार्झो सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच लीक आणि त्याशी संबंधित फीचर्स समोर आले आहेत. आता या डिव्हाइसच्या नवीन प्रीमियम डिझाइनचा फर्स्ट लूकही लीक झाला आहे. रियलमी Narzo 60 मध्ये युजर्सला कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मिळण्याची चिन्हे आहेत.

91मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, नवीन डिव्हाइसच्या डेव्हलपमेंट टीमशी संबंधित एका सूत्राने नवीन Narzo 60 स्मार्टफोनचे डिझाइन शेअर केले आहे. या लीकमध्ये डिव्हाइसचा फर्स्ट लूक दिसत असून कंपनीने याला ‘मार्शियन होरायझन’ असे नाव दिले आहे. नावावरुनच हे स्पष्ट होते की, या फोनचे डिझाइन मंगळापासून प्रेरित आहे आणि आता त्याच्या चित्रात लाल ग्रहाची झलक आहे.

स्मार्टफोनचा केशरी बॅक पॅनेल

लीक झालेल्या इमेजमध्ये फोनच्या बॅक पॅनेलवर एक मोठे गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत असून ते केशरी रंगात दिसत आहे. फोनचे डिझाइन रिअलमी ११ प्रो सीरिजच्या मॉडेल्ससारखेच दिसत असले तरी रियर पॅनेल मंगळाच्या पृष्ठभागाच्या रंगापासून नक्कीच प्रेरित आहे. ११ प्रो सीरिजच्या मॉडेल्सप्रमाणे या फोनमध्येही फॉक्स लेदर डिझाइन आणि क्लीन फिनिश मिळणार असल्याचे समोर आले आहे.

हा स्मार्टफोन 1 टीबी पर्यंतइंटरनल स्टोरेजसह येईल

डिव्हाइसच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर्स आणि पॉवर बटन देण्यात येणार असल्याचे या इमेजमध्ये दिसत आहे. या फोनमध्ये युजर्सला अॅल्युमिनियम फ्रेम मिळणार असून गोल कॉर्नर पाहायला मिळाले आहेत. मात्र, रियलमी Narzo 60 सीरिजचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आलेले नाहीत. या डिव्हाइसचे किमान एक व्हेरियंट १ टीबी स्टोरेजसह लाँच करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Realme Narzo 60 5G Price in India check details on 27 June 2023.

हॅशटॅग्स

#Realme Narzo 60 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x