19 May 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

BCL Industries Share Price | 1700 टक्के परतावा देणारा बीसीएल इंडस्ट्रीज शेअर स्प्लिट होणार, सोबत मिळणार भरघोस डिव्हीडंड

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड घोषणेच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त तेजीत आले आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड लाभ देण्याची घोषणा केली आहे. मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

खाद्यतेल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट मिळवून दिला आहे. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे 0.69 टक्क्यांच्या वाढीसह 512 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,250 कोटी रुपये आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने नुकताच 1:10 या प्रमाणात शेअर विभाजन करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. शेअर बाजारातील कंपन्या आपल्या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि तरलता वाढवण्यासाठी स्टॉक स्प्लिट करत असतात.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 5 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2023 तिमाहीमध्ये BCL इंडस्ट्रीज कंपनीने Q4FY13 मध्ये 6 टक्के वाढीसह 24.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 22.58 कोटी रुपये होता.

मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या वार्षिक विक्रीत 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर कंपनीने 457.19 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स कोविड काळात 29.5 रुपये या नीचांकी किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर शेअरची किंमत 1,700 टक्क्यांनी वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

मागील अडीच वर्षांत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 276.15 रुपये होती. जी आता 90 टक्क्यांनी वाढली आहे. बीसीएल इंडस्ट्रीज ही कंपनी भारत आणि दक्षिण आशियाई देशात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेटेड डिस्टिलरी इथेनॉल प्लांट चालवणारी एकमेव कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी रिफाइंड तेलांसह खाद्यतेल उत्पादन देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x