नवी दिल्ली : राज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान पदवीधर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या अध्यादेशावर अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये यासाठी मराठा विद्यार्थी आणि पालक राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.

खुल्या प्रवर्गातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी-पालक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार असून मराठा विद्यार्थ्यांसंबंधीच्या अध्यादेशावर सही न करण्याची मागणी करणार आहेत. यंदा मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता थेट मेरिट नुसार प्रवेश द्यावे, याबाबत मागणी करणार आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातील दीडशेहून अधिक विद्यार्थी आज सकाळी राजभवनाबाहेर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाविरोधात निदर्शने करणार आहेत.

वैद्यकीय प्रवेश: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आज राजभवनासमोर निदर्शने