4 May 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

Oppositions Unity | भाजपची डोकेदुखी वाढणार, विरोधी पक्षाच्या महाआघाडीत आता छोट्या पक्षांनाही निमंत्रण, संख्या २४ वर गेली

Oppositions Unity

Oppositions Unity | विरोधकांच्या एकजुटीच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही एनडीए वाढविण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्यासोबत, जे येतं नाहीत त्यांचे पक्ष फोडून स्वतःसोबत घेण्याचे प्रकार सुरु केले आहेत. त्यात आता विरोधी पक्षांना आपली रणनीती अजून मोठी केल्याने भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.

छोट्या पक्षांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण

काँग्रेसने पुढाकार घेत आता छोट्या पक्षांनाही या बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. बेंगळुरू येथे १७-१८ जुलै रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीला आता किमान २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात संयुक्त आघाडी उभारण्याच्या विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना आठ नव्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके), कोंगू देसा मक्कल काची (केडीएमके), विदुथलाई चिरुथीगल काची (व्हीसीके), रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणि) हे नवीन राजकीय पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केडीएमके आणि एमडीएमके हे भाजपचे मित्रपक्ष होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पुढील बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २३ जून रोजी पाटणा येथे बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाल्याची आठवण काँग्रेस अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात केली आहे.

खर्गे यांनी आपल्या निमंत्रण पत्रात म्हटले

खर्गे यांनी आपल्या निमंत्रण पत्रात म्हटले आहे की, ही बैठक यशस्वी झाली कारण आम्ही आपल्या लोकशाही राज्यव्यवस्थेला धोक्यात आणणाऱ्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकलो. त्याचबरोबर पुढील लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचे त्यांनी एकमताने मान्य केले. आम्ही जुलैमध्ये पुन्हा भेटण्यास तयार झालो आहोत, अशी आठवण काँग्रेस अध्यक्षांनी नेत्यांना करून दिली. ही चर्चा सुरू ठेवणे आणि आपण निर्माण केलेली गती वाढविणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. आपल्या देशासमोरील आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी आपण एकत्र काम करण्याची गरज आहे.

याशिवाय मी खर्गे यांनी विनंती पत्रात म्हटले आहे की, 17 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता बेंगळुरूयेथे रात्री 6 वाजता डिनरनंतरच्या बैठकीला उपस्थित राहा. १८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ही बैठक पुन्हा सुरू राहणार आहे. बेंगळुरूमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. ”तत्पूर्वी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही गुरुवारी विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी बेंगळुरूला जाणार असल्याचे सांगितले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीची पहिली बैठक २३ जून रोजी पाटणा येथे आयोजित केली होती, ज्यात १५ हून अधिक पक्ष उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन उपस्थित होते.

News Title : Oppositions Unity total political party count reached to 24 check details on 12 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Oppositions Unity(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या