18 May 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Manipur Women Case | 'सरकार गप्प राहिले तर आम्ही कारवाई करू', मणिपूरबाबत सुप्रीम कोर्टाच्या अल्टिमेटमनंतर पंतप्रधान बोलू लागले

Manipur Women Case

Manipur Women Case | मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न अवस्थेत त्यांची परेड केल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली असून या प्रकरणाची सुनावणी २८ जुलै रोजी ठेवली आहे. या संपूर्ण घटनेबाबत न्यायालयाने केंद्र सरकारकडून अहवाल ही मागवला असून वेळीच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहिल्यांदाच या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दोन महिलांना नग्न अवस्थेत परेड केल्याच्या व्हिडिओमुळे आपण व्यथित झालो आहोत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीही सरकारला कडक शब्दात कारवाई करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारची घटना पूर्णपणे अस्वीकार्य असून ती अत्यंत दु:खद आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे संविधान आणि मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारने काही केले नाही तर आम्ही कारवाई करू, असा इशाराही दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारकडून अहवाल ही मागवला आहे. लोकशाहीत हिंसेचे साधन म्हणून महिलांचा वापर अजिबात मान्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुख्य आरोपीला अटक
एका कुकी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी खुरियम हीरो दास याला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये आरोपीहिरव्या रंगाचा चेक शर्ट परिधान करताना दिसत आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत. याशिवाय पोलिसपीडितांचाही शोध घेत आहेत. त्यांनी अद्याप तक्रार दाखल केली नसली तरी त्यांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिले कारवाईचे आश्वासन
सुप्रीम कोर्टाच्या अल्टिमेटमनंतर अखेर तीन महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर पहिल्यांदा बोलले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदीयांनी मणिपूरमधील या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ‘मणिपूरच्या घटनेने माझे मन दु:खी झाले आहे. संपूर्ण देशाला लाज वाटते. अशा घटना संपूर्ण देशावर आणि प्रत्येक देशवासीयावर कलंक आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही आणि कायदा योग्य ती कारवाई करेल, असेही ते म्हणाले. त्यांना कधीही माफ केले जाणार नाही.

News Title : Manipur Women Case Supreme Court Ultimatum check details on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Women Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x