15 December 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

मागील २४ तासांत देशात १०३५ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ७४४७ वर

Corona Crisis, Covid19

मुंबई, ११ एप्रिल: जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा ७ हजार ४४७ वर पोहचला आहे.

मागील काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.

सध्या देशातील ६१ टक्के Coronavirus कोरोनाबाधित रुग्ण ६ राज्यात आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगाना, कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच ६ राज्यांत सर्वाधिक ५२ लॅब आहेत. त्यामुळेच रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. आता नवीन २१ लॅब स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यापैकी ५ लॅब याच ६ राज्यात स्थापन होणार आहेत.

 

News English Summary: The prevalence of coronary arrests is increasing rapidly in the country. Corona has killed 40 people across the country in the last 24 hours and a total of 1,035 new patients have been registered. At the same time, the total number of criminals in the country has reached 7 thousand 447.

News English Title: Story Corona virus India’s total number corona positive cases rises 7447 Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x