28 April 2024 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

सीबीआय संचालकांना तडकाफडकी का हटवलं?; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : सीबीआय सारख्या महत्वाच्या विभागात झाल्याचे हालचालींमुळे देशभर मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती. दरम्यान, हा वाद इतका विकोपाला गेला होता की विरोधकांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, सध्या हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला असून तिथे सुद्धा मोदींवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.

दरम्यान, आज या वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मोदी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार तडकाफडकी काढून घेत मोदी सरकारने त्यांना थेट रजेवर धाडले होते. मोदी सरकारच्या नेमक्या त्याच निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरन्यायाधीशांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. आलोक वर्मांचे सर्व अधिकार काढून घेण्याआधी निवड समितीची मतं जाणून घेणे मोदी सरकारला का महत्वाचे वाटले नाही, असा थेट सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, CBI संचालक आलोक वर्मा आणि त्यांचे क्रमांक २ चे अधिकारी राजेश अस्थाना यांच्यातीला वाद प्रचंड टोकाला गेला होता. त्यानंतर मोदी सरकारने तडकाफडकी निर्णय घेत आलोक वर्मांचे अधिकार काढून घेतले आणि त्यांना थेट सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

तसेच सरकारने नेहमी निष्पक्षपाती असले पाहिजे. त्यामुळे आलोक वर्मांचे सर्व अधिकार काढून घेण्याआधी निवड समितीचे मत विचारात घेण्यात सरकारला नेमकी काय अडचण होती? कोणत्याही सरकारचा हेतू हा सर्वोत्तम पर्याय निवडणे असाच असला पाहिजे, अशी थेट विचारणा सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल यांच्याकडे केली असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x