
PM Kisan Yojana | चौदाव्या हप्त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून १२ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची प्रतीक्षा आज संपणार आहे. केंद्र सरकार 27 जुलै रोजी पीएम किसान लाभार्थ्यांसाठी 14 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. पीएमओ कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार साडेआठ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १७ हजार कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. म्हणजे आज सुमारे साडेतीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.
गुरुवारी पंतप्रधान मोदी राजस्थानमधील सीकर मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतील आणि ते राष्ट्राला समर्पित करतील. युरिया गोल्डचे लोकार्पण करताना ते एक लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे (पीएमकेएसके) देशाला समर्पित करतील.
पीए किसान सन्मान निधी योजनेतील घोटाळा रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक पावले उचलली तेव्हा पूर्वीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. एप्रिल-जुलै 2022-23 साठी 11.27 कोटी शेतकऱ्यांना हप्ता मिळाला होता. परंतु, ऑगस्ट-नोव्हेंबर २०२२-२३ मध्ये केवळ ८ कोटी शेतकऱ्यांना हप्ते मिळाले. डिसेंबर-मार्च २०२२-२३ मध्ये ही संख्या ८.८० कोटींवर आली. म्हणजे फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा परिणाम दिसू लागला आहे.
स्टेटस कसे तपासावे : पीएम किसान पोर्टलवर लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित असणे आवश्यक आहे. यासाठी पोर्टलवर दिलेल्या लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर गेट डेटावर क्लिक करा. तुमची स्थिती तुमच्यासमोर असेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची रक्कम मिळते.
तुमचे नाव यादीतून वगळण्यात आलेले आहे?
आगामी हप्ता तुमच्या खात्यात येईल की नाही हे ही तुम्हाला पाहायचे असेल तर ताबडतोब यादी तपासून पहा. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…
स्टेप-1: सर्वप्रथम पीएम किसान https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा. येथे बीफिसिअरी यादीवर क्लिक करा किंवा टॅप करा.
स्टेप 2: यानंतर स्टेट बॉक्समध्ये तुमच्या राज्याचं नाव सिलेक्ट करा. जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्याचे, उपजिल्ह्याचे नाव निवडा. त्याच्या ब्लॉकचे आणि नंतर गावाचे नाव भरा आणि गेट रिपोर्टवर क्लिक करा. तुमच्यासमोर पीएम किसानच्या लाभार्थ्यांची यादी येईल. तुमचे नाव डिलीट झाले नाही तर ते नक्कीच असेल.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.