 
						GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या धरे धारकांना प्रत्येक शेअरवर 1 अतिरिक्त बोनस शेअर मोफत देणार आहे. यासोबतच कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश देखील वाटप करणार आहे. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
बोनस शेअर्स आणि लाभांश संबंधित बातमी जाहीर होताच, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे मागील ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1,006.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 1,040.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लाभांश आणि बोनसची रेकॉर्ड तारीख :
जीएनए एक्सल्स कंपनीने 11 ऑगस्ट 2023 हा दिवस लाभांश आणि बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. जीएनए एक्सल्स कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात पहिल्यांदाच 1,000 रुपयेचा टप्पा पार केला आहे. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 1,008.60 रुपये होती. 21 जुलै 2023 रोजी आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले आहेत. या चालू महिन्यात शेअरची किंमत 20.46 टक्के वाढली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
जीएनए एक्सल्स ही कंपनी ऑन-हायवे आणि ऑफ हायवे अशा दोन्ही प्रकारच्या वाहन विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिअर एक्सल शाफ्टची सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक मानली जाते. ऑन- हायवे विभागामध्ये कंपनी हलकी व्यावसायिक वाहने, मध्यम व्यावसायिक वाहने, अवजड व्यावसायिक वाहने, आणि इतर वाहतूक वाहनांसाठी एक्सल शाफ्ट, बस, स्पिंडल्स,. यांचे उत्पादन करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		