
Hardwyn India Share Price | हार्डविन इंडिया या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 40.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. (Hardwyn Share Price)
मागील 3 वर्षात हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 67 पैशांवरून वाढून 40 रुपयेवर पोहचली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57 रुपये होती.
हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 13.44 रुपये होती. 31 जुलै 2020 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 67 पैशांवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.67 टक्के वाढीसह 42.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षात 1 लाखावर 61 लाख परतावा :
16 ऑगस्ट 2023 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 40.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षात हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6017 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 61.17 लाख रुपये झाले असते.
हार्डविन इंडिया कंपनीने मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीच्या तुलनेत जून 2023 च्या तिमाहीत 16 टक्के वाढीसह 1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 87 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 1.59 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीचे निव्वळ विक्री प्रमाण 6.85 टक्क्यांच्या वाढीसह 27.3 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी जून तिमाही कालावधीत कंपनीने 25.60 कोटी रुपयेची निव्वळ विक्री साध्य केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.