14 December 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Pyramid Technoplast IPO | आला रे आला IPO आला! पिरॅमिड टेक्नोप्लास्ट IPO शेअरची प्राईस बँड आणि आजची GMP पहा, मजबूत परताव्याचे संकेत

Pyramid Technoplast IPO

Pyramid Technoplast IPO | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त हालचाली पाहायला मिळत आहेत. अनेक नवनवीन कंपन्या आपले IPO शेअर बाजारात लाँच करत आहेत. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस पैसे कमावू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनी 18 ऑगस्ट 2023 रोजी आपला IPO लाँच करणार आहे.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 55 लाख फ्रेश शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. यासह ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 37.2 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 139-153 कोटी रुपये भांडवल उभरणी करणार आहे.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीची प्रवर्तक क्रेडेन्स फायनान्शियल कन्सल्टन्सी ऑफर फॉर सेल अंतर्गत 37.2 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 151-166 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 90 शेअर्स खरेदी करू शकतात.

एका लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 14,940 रुपये जमा करावे लागणार आहे. पिरॅमिड टेक्नोप्लास्ट ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 30 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवणार आहे. यासह 20 टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल, आणि 50 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट GMP :

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 24 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटमधील कामगिरी पाहून गुंतवणूकदार या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

पीएनबी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस आणि फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल यांना पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीच्या IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, बिगशेअर सर्व्हिसेस ला पिरॅमिड टेक्नोप्लास्ट IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

IPO संबंधित महत्त्वाच्या तारखा :

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीचा IPO 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल. 29 ऑगस्ट 2023 पर्यंत IPO शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. आणि 30 ऑगस्ट 2023 रोजी पिरॅमिड टेक्नोप्लास्ट कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pyramid Technoplast IPO GMP Today on 17 August 2023.

हॅशटॅग्स

Pyramid Technoplast IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x